शुक्रवार, २९ जून, २०१८

महिलांसाठी भारत देश सर्वाधिक धोकादायक - २८ जून २०१८

महिलांसाठी भारत देश सर्वाधिक धोकादायक - २८ जून २०१८

* भारत हा महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक देश आहे, असा अहवाल थॉमसन रॉयटर्स फाउंडेशन या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा बलात्कार, महिलांवर अत्याचार, महिलांचे शोषण यामध्ये अग्रस्थानी आहे. 

* या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी युद्धग्रस्त सीरिया आणि  अफगाणिस्थानपेक्षाही असुरक्षित देश आहे. ५५० महिला विशेषज्ञाच्या टीमने हे सर्वेक्षण केलेले आहे. 

* या यादीत अमेरिकेचाही समावेश करण्यात आला असून यामध्ये अमेरिकेचा तिसरा क्रमांक आहे. २०११ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार अफगाणिस्तान, काँगो, पाकिस्तान, भारत मानले आणि सोमालिया हे देश सर्वात असुरक्षित मानले गेले होते. 

* परंतु यावर्षी भारतातील महिलांचे वाढलेले प्रश्न पाहून यावेळी भारताला सर्वात असुरक्षित देश असल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. भारत मानव तस्करी करण्यात आणि महिलांना सेक्स व्यवसायासाठी परावृत्त करण्यात अव्वल आहे. असे या सर्वेक्षणातून दिसुन आले. 

* महिला आणि बाल विकास मंत्रालयाने या सर्व्हेच्या अहवालानुसार बोलण्यास नकार दिला आहे. या अहवालानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली. 

* तसेच महिलांबाबतचा अनादर भारतात सातत्याने दिसुन येतो आहे. बलात्कार, वैवाहिक बलात्कार लैंगिक अत्याचार आणि छळ हे सगळे सहन करावे लागते. 

* जगाचा भारताचा आर्थिक विकास होण्याचा वेग वाढला आहे. २००७ ते २०१६ या कालावधीत भारतात महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रमाण ८३ टक्क्यांनी वाढले आहेत. 

* दर तासाला बलात्काराच्या किंवा लैगिक छळाच्या तीन ते चार तक्रारी नोंदविल्या जात आहेत. असेही या अहवालात म्हटले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.