शुक्रवार, १ जून, २०१८

संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी - १ जून २०१८

संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी - १ जून २०१८

* राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये २०१४ आणि २०१८ मध्ये सुवर्णपदकांची कमाई करणारी भारताची वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे.

* त्यामुळे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनकडून संजिता चानूवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तिच्या नमुन्यात अंश सापडले आहेत. संजीताकडून हा नमुना कधी घेण्यात आला होता.

* गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला १३ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं होत. त्यानंतर गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संजिता चानून ५३ किलो वजनी गटाच सुवर्णपदक पटकावलं होत.

* ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चानूने विक्रम रचला आहे. संजीता चानूने १९२ किलो वजन उचलत भारताला सुवर्ण मिळवून दिल. जो एक विश्वविक्रम आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.