बुधवार, ९ मे, २०१८

MPSC साठी आधार सक्ती ३१ मे पर्यंत आवश्यक - ९ मे २०१८

MPSC साठी आधार सक्ती ३१ मे पर्यंत आवश्यक - ९ मे २०१८

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन प्रोफाइलमध्ये आधार क्रमांक भरणे गेल्यावर्षीपासून अनिवार्य केले आहे. आयोगाच्या विविध परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाइलमध्ये आधार क्रमांक ३१ मे पर्यंत अपडेट करावा लागणार आहे. असे आयोगाने सांगितले आहे.

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

* प्रोफाईलच्या माध्यमातून अतिरिक्त महत्वाची माहिती उमेदवाराकडून प्राप्त केली जाते. त्याचबरोबर गेल्या मार्च २०१७ पासून आधारकार्ड मध्ये नोंदविल्याप्रमाणे नाव व आधार क्रमांक वेगवेगळे नोंदविणे बंधनकारक केले आहे.

* हे शक्य होण्यासाठी एप्रिल २०१६ मध्येच आयोगाने घोषणा करून उमेदवारांनी आधारकार्ड काढले नसल्यास ते काढण्यासाठी सूचना देऊन पुरेसा अवधी दिला होता.

* ज्या उमेदवारांकडे आधारकार्ड नाही त्यांनी त्वरित आधारकार्ड आधारकार्ड काढावे असे आव्हानही आयोगाकडून करण्यात आले.

* तरीही ज्या विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड काढले आहे. त्यांनी माहिती ३१ मे पर्यंत अपडेट करावी अन्यथा एक जूनपासून सर्व प्रोफाइल निष्क्रिय केले जाईल असेही आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्रातून दरवर्षी १३ ते १४ लाख उमेदवार या परीक्षेला बसतात.

* उमेदवारांनी ओळख पटण्यासाठी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी उमेदवाराच्या ऑनलाईन प्रोफाइलमध्ये त्यांनी त्याचा आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक करण्याच्या निर्णय आयोगाने घेतला.

* त्यामुळे ज्या उमेदवाराकडे आधारकार्ड नाही. त्यांनी त्वरीत आधारकार्ड काढावे असे आवाहनही आयोगाकडून वारंवार केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.