गुरुवार, १० मे, २०१८

इराणच्या अणुकरारातून अमेरिका बाहेर - १० मे २०१८

इराणच्या अणुकरारातून अमेरिका बाहेर - १० मे २०१८

* बराक ओबामा यांच्या कार्यकाळात २०१५ मध्ये इराणबरोबर करण्यात आलेल्या अणुकरारातून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली.

* इराणबरोबरचा अणुकरार हा कुजका आणि निकामी असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आजच्या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या आजच्या निर्णयामुळे अमेरिका आणि त्यांचे मित्र देश यांच्यात मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

* ट्रम्प यांनी आजच इराणच्या विरोधात काही निर्बंध लादण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले. तसेच अणु कार्यक्रमासाठी इराणला सहयोगी देशांनी मदत करू नये असेही बजावले आहे.

* इराणबरोबर करण्यात आलेल्या अणुकराराला अमेरिकेसह ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया, आणि जर्मनी यांचा पाठिंबा आहे.

* या करारानुसार इराणवर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले होते, तसेच गोठविलेली संपत्तीही इराणला परत देण्यास परवानगी दिली होती.

* त्या बदल्यात इराणच्या अणू कार्यक्रमावर आणि चाचण्यांवर निर्बंधही लादण्यात आले. या करारातून अमेरिका बाहेर पडणार असल्याची शक्यता ट्रम्प यांनी या आधीच बोलूनही दाखविली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.