गुरुवार, ३१ मे, २०१८

भारताचा विकासदर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज - ३१ मे २०१८

भारताचा विकासदर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज - ३१ मे २०१८

* भारताच्या विकासदार वाढीच्या अंदाजात घट केल्याची माहिती मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमानांकनात संस्थेने दिली आहे. या याआधी भारताचा विकासदर ७.५ राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

* आता संस्थेने नवीन कपात करत विकास दर ७.३% राहण्याचा अंदाज ठरविण्यात आला आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे.

* २०१९ मध्ये जीडीपी पुन्हा ७.५% राहणार आहे. असे मूडीजने स्पष्ट केले आहे. येत्या काही महिन्यामध्ये वस्तू व सेवा कराचा जीएसटी परिणामही अर्थव्यवस्थेवर जाणवणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

* समाधानकारक पाऊस, शेतमालाला आधारभूत किंमत आणि ग्रामीण भागातील वाढती उलाढाल यामुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग उत्तम राहणार आहे. असे मूडीजचे म्हणणे आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.