रविवार, १३ मे, २०१८

आशियाई कॅडेट कुस्तीत अंशुला सुवर्ण - १३ मे २०१८

आशियाई कॅडेट कुस्तीत अंशुला सुवर्ण - १३ मे २०१८

* कॅडेट गटाच्या आशियाई अजिक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताने एका सुवर्णपदकासह एकूण सात पदकांची कमाई केली आहे. यात हरियाणाची अंशू मुलीच्या ६१ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली.

* स्पर्धेत पहिल्या दोन दिवसात भारताने आतापर्यंत एकूण १३ पदकाची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी भारताने मुलांच्या ग्रीको रोमन प्रकारात एक रौप्य आणि ब्राँझपदकाची कमाई केली होती.

* मुलींच्या गटात नोर्डिक पद्धतीत झालेल्या पहिल्या लढतीत अंशूने चीनच्या क्वीन जावो हिचा प्रतिकार ८-४ असा मोडून काढला आहे.

* त्यानंतर तिने मंगोलियाच्या बकटहुयाग हिला गुणांवरच ४-१ असे सहज पराभूत केले. नव्या पद्धतीनुसार झालेल्या क्रॉस सेमी फायनलमध्ये तिने उझबेकिस्तान अझीझेव हिच्याविरुद्ध कमालीचा आक्रमक खेळ करून तिला एकतर्फी लढतीत १०-० असे हरवले.

* अंशू हिने गेल्या वर्षी अथेन्स येथे झालेल्या कॅडेट गटाच्या जागतिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले होते. या कामगिरीने ती अर्जेंटिनात ब्युनोस आयर्स येथे होणाऱ्या युवा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.