सोमवार, ७ मे, २०१८

ब्लाडिनीर पुतीन रशियाचे पुन्हा अध्यक्ष - ८ मे २०१८

ब्लाडिनीर पुतीन रशियाचे पुन्हा अध्यक्ष - ८ मे २०१८

* ब्लाडिनीर पुतीन यांनी आज रशियाच्या अध्यक्षपदाची चौथ्यांदा शपथ घेतली आहे. सुमारे दोन दशकापासून सत्तेवर असलेले पुतीन हे आणखी सहा वर्षासाठी अध्यक्ष असणार आहेत.

* क्रेमलिन मध्ये झालेल्या शपथविधी समारंभात पुतीन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली १९९९ पासून सत्तेवर असलेल्या पुतीन यांच्या पक्षाने मार्चमध्ये रशियात झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये ७६.७ टक्के मते मिळवत विजय संपादन केला.

* अध्यक्षपदी पुतीन यांचीच निवड होणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात होते. रशियाला अधिक समृद्ध आणि बळकट बनविण्यासाठी मी प्रयत्न करेन असे पुतीन शपथ विधीवेळी म्हणाले.

* दरम्यान रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पुतीन यांनी पंतप्रधानासाठी दिमित्री मेदवेदेव यांच्या नावाची शिफारस केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.