बुधवार, ९ मे, २०१८

वॉलमार्टने केली फ्लिपकार्टची खरेदी - ९ मे २०१८

वॉलमार्टने केली फ्लिपकार्टची खरेदी - ९ मे २०१८

* भारतातील ईकॉमर्समधील सगळ्यात मोठी कंपनी फ्लिपकार्ट अमेरिकी जायंट कंपनी वॉलमार्ट हिला ७७ टक्के हिस्सा १६ अब्ज डॉलर्सना [सुमारे एक लाख कोटी रुपये] विकणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

* भारतामध्ये असलेल्या संधीचा विचार करता ही बाजारपेठ जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. भारतातल्या ईकॉमर्सच्या बाजारपेठेमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये भागीदारी मिळण्याची संधी आमच्यासाठी महत्वाची आहे.

* अशी भावना वॉलमार्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी व्यक्त केली आहे. हे मेगाडील करण्यासाठी मॅकमिलन सध्या भारतात आले आहेत.

* फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांबरोबर मॅकमिलन सरकारी अधिकाऱ्यांच्याही भेटीगाठी घेणार असून भारतामधल्या व्यवसाय वृद्धीच्या संधीचा अंदाज घेणार आहे.

* फ्लिपकार्टचे सहसंस्थापक व ग्रुप सीईओ बिन्नी बन्सल यांनी सांगितले की, भारतामध्ये गुंतवणूक येणं प्रचंड महत्वाचं आहे.

* रिटेल क्षेत्रामधल्या पुढील काळात येऊ घातलेल्या लाटेमध्ये स्वार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या गुंतवणुकीला अनन्यसाधारण महत्व आहे.

* याखेरीज वॉलमार्ट आणखी दोन अब्ज डॉलर्स किंवा १३ हजार कोटी फ्लिपकार्टमध्ये करणार आहे. फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी वॉलमार्टची प्रतिस्पर्धी कंपनी असलेली अमेझॉनही स्पर्धेत होती.

* परंतु फ्लिपकार्ट वॉलमार्टला पसंती दिली. तंज्ञाच्या मते ईकॉमर्स क्षेत्रामधलं दुसरी कंपनी ताब्यात घेण्याच्या बाबतीत हे जगातलं सगळ्यात मोठं डील आहे.

* त्यामुळे जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारात वॉलमार्ट व अमेझॉन यांचं व्यापार युद्ध आमने सामने रंगणार आहे. दरम्यान अमेझॉनने भारतीय कंपनीमध्ये २६०० कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे.

* त्यामुळे गेल्या वर्षभरात भारतात अमेझॉनने केलेली गुंतवणूक १०,७५० कोटी रुपये इतकी झाली आहे. भारतातला ईकॉमर्सची उलाढाल गेल्या वर्षी २१ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. इंटरनेटचा वापर जसा वाढेल तशी ही उलाढालही वाढणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.