बुधवार, १६ मे, २०१८

कर्नाटक विधानसभा निकाल २०१८ - १६ मे २०१८

कर्नाटक विधानसभा निकाल २०१८ - १६ मे २०१८

* कर्नाटक विधानसभा निवडणुकात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी, स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पराभूत झालेल्या काँग्रेसने आता जनता दल धर्मनिरपेक्षचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर केल्याने सत्तेसाठी तिथे खरोखरच सत्तेचे कर नाटक पाहायला मिळणार आहे.

* या निवडणुकीत भाजपाला सर्वात जास्त १०४ जागा, नंतर काँग्रेसला ७८ जागा, जेडीएस ३८, इतर २ अशा स्वरूपाचे निकाल हाती आले आहेत.

* भाजपचे नेते येडियुरप्पा, तसेच जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी मंगळवारी राज्यपाल वजुभाईवाला यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

* भाजपाचे १०४ जण निवडून आले आहेत. काँग्रेसचे ७८ व जनता दलाचे ३७ व बसपाचा एक निवडून आले आहेत. त्यांची बेरीज ११६ होते. सत्तेसाठी ११२ आमदारांची गरज आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.