सोमवार, ७ मे, २०१८

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी हरेंद्र सिंह - ७ मे २०१८

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी हरेंद्र सिंह - ७ मे २०१८

* राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर, महिला संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांची भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

* तर पुरुष संघाचे विद्यमान प्रशिक्षक जॉर्ड मरिन यांना पुन्हा एकदा महिला संघाच्या प्रशिक्षकपदी जबाबदारी देण्यात आली आहे.

* सुलतान अझलन शहा चषक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघ पदक मिळविण्यात अयशस्वी ठरला.

* हरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाचे विश्वचषकार आपले नाव कोरले होते. याशिवाय भारतीय संघातील अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा हरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली चांगला अनुभव आहे.

* आता आगामी चॅम्पियन ट्रॉफी, विश्वचषकाच्या स्पर्धामध्ये हरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.