शुक्रवार, २५ मे, २०१८

देशातील पहिले क्रिडा विद्यापीठ मणिपूरला स्थापन होणार - २४ मे २०१८

देशातील पहिले क्रिडा विद्यापीठ मणिपूरला स्थापन होणार - २४ मे २०१८

* क्रीडा विद्यापीठ उभारण्याचे स्वप्न आता आकारला येणार आहे. कॅबिनेटने बुधवारी देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ मणिपूर येथे उभारण्यास मंजुरी दिली आहे.

* देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ मणिपूर येथे उभारण्यास मंजुरी दिली आहे. कॅबिनेटच्या या निर्णयाविषयी माहिती विधी व न्यायमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली.

* देशातील पहिले क्रीडा इंफाळ येथे उभे राहावे या संदर्भातील विधेयक यापूर्वीच लोकसभेत मांडण्यात आले असून, त्याविषयीचा निर्णय प्रलंबित आहे.

* लोकसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकाला अनुसरूनच हा अध्यादेश काढण्यात आला. या निर्णयामुळे आता क्रीडाज्ञानासाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांना हक्काचे व्यासपीमंजुरी मिळेल.

* या विद्यापीठासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. क्रीडा शास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा व्यवस्थापन हे सर्व शिक्षक एकाच छताखाली मिळणार. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.