गुरुवार, ३१ मे, २०१८

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन - ३१ मे २०१८

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन - ३१ मे २०१८

* राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षाचे होते. 

* फुंडकर यांच्या अकाली निधनाने भाजपसह सर्वानाच धक्का बसला आहे. फुंडकर हे काही आजारी नव्हते. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने महाराष्ट्रातील बडा चेहरा हरविला आहे.

* महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढविण्यासाठी पांडुरंग फुंडकर यांचे मोठे योगदान आहे. गोपीनाथ मुंडेसोबत त्यांनी महाराष्ट्रात भाजपचा प्रचार व प्रसार होणार आहे.

* ग्रामीण आणि शेती प्रश्नांची जाण असल्याचे फुंडकर राज्यात परिचित होते. ते बुलढाण्याचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होते. ते विधानपरिषदेचे आमदार होते.

* पांडुरंग फुंडकर यांचा जन्म १९५० मध्ये बुलढाण्यातील खामगावमध्ये झाला. फुंडकर पहिल्यांदा १९७८ मध्ये आमदार म्हणून निवडून आले.  १९८५ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.

* १९९१ ते ९६ या काळात त्यांनी भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते पण होते. सलग तीनवेळा खासदार म्हणून लोकसभा मतदार संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले.

* फुंडकर भाजपचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत अकोला मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर १९७८ आणि १९८० मध्ये फुंडकर खामगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आले.

* त्यांनी ८ जुलै रोजी फडणवीस सरकारमध्ये कृषिमंत्री पदाची शपथ घेतली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.