मंगळवार, ८ मे, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १२ मे २०१८

काही नवीन चालू घडामोडी - १२ मे २०१८

* जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या स्वीडिश ऍकेडमीतील सदस्यावर झालेला सेक्स स्कँडलचा आरोप आणि इतर समस्यांमुळे यंदाचा २०१८ साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.

* भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी काळात सरे या काऊंटी क्रिकेट क्लबमधून खेळणार आहे.

* गेल्या पाच वर्षात पत्रकारांवरील हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे जागतिक माध्यम स्वतंत्रदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या युनेस्कोच्या अहवालात म्हटले आहे.

* ज्येष्ठ विचारवंत आणि मार्क्सवादी अर्थतज्ञ अशोक मित्रा यांचे ८ मे रोजी निधन झाले ते ९० वर्षाचे होते.

* भारतीय नेमबाज शाहजर रिजवी याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी झेप घेतली आहे.

* जगप्रसिद्ध स्वीडिश डीजे एवीची ओमानची राजधानी मस्कतमध्ये २१ एप्रिल रोजी आत्महत्या केली. तो अवघ्या २८ वर्षाचा होता. त्याला काही प्रमाणात नैराश्य आले होते.

* महाराष्ट्रातील अन्न प्रशासनाने सुचविलेला बर्फ उत्पादन संदर्भातील पॅटर्न केंद्र सरकारने स्वीकारला असून देशातील सर्वच राज्यांना तो लागू केला.

* मुंबई कार्यालयात अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकाने काढला. प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण वापर होतो का हे पाहण्यासाठी मराठी सक्तीचा आदेश काढला आहे.

* चीनमध्ये प्रथमच पहिल्या तिमाहीत सतरा वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच चालू खात्यावर तूट दिसून आली. गेली काही वर्षे चीनची निर्यातीत मक्तेदारी होती. ती आता संपत चालल्याची ही लक्षणे आहेत.

* स्मार्टफोन कंपनी शाओमी लवकरच हॉंगकॉंग च्या बाजारात शेअर बाजारात प्रथमच समभाग विक्री आयपीओ काढणार आहे. २०१४ बाजारात येणारा जगातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.

* नवीन शैक्षणिक वर्षांपासून शालेय शिक्षण विभागातर्फे सरकारी शाळातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ओजस या आंतरराष्ट्रीय शाळांची सुरुवात करण्यात येणार आहे.

* अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीआयएचे माजी संचालक माईक पेप्सिको यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून निवड केली.

* भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने देशभरात आदिवासी जिल्ह्यामध्ये [वन धन विकास] केंद्राची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

* अमेरिकेच्या NASA संस्थेने मंगल ग्रहाच्या आंतरिक बाजूचा अभ्यास चालविण्यासाठी ५ मे २०१८ रोजी 'इनसाईट' ही आपली मोहीम अंतराळात पाठविली आहे.

* नवी दिल्लीत जलस्रोत, नदी विकास, आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या अंतर्गत [राष्ट्रीय जल माहिती केंद्र ची स्थापना करण्यात आली आहे.

* नवीन शैक्षणिक वर्षांपासून शालेय शिक्षण विभागातर्फे सरकारी शाळातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी [ओजस] या आंतरराष्ट्रीय शाळांची सुरुवात करण्यात येणार आहे.

* जगभरातील सर्वात शक्तिशाली नेत्यांच्या फोर्ब्स या मासिकाने जारी केलेल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीना नववे स्थान देण्यात आले आहे.

* गुजराती प्रयोगशील कवी सीतांशू यशचंद्र मेहता यांना त्यांचं वखर या काव्यसंग्रहासाठी बिर्ला फाउंडेशनकडून दिला जाणारा [सरस्वती सन्मान] हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

* शेतीआधारित मराठा व कुणबी या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे पर्याय शोधण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

* ज्येष्ठ विचारवंत आणि मार्क्सवादी अर्थतज्ञ अशोक मित्रा यांचे ८ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.