रविवार, २७ मे, २०१८

रियल मद्रिदने जिंकली चॅम्पियन लीग ट्रॉफी - २७ मे २०१८

रियल मद्रिदने जिंकली चॅम्पियन लीग ट्रॉफी - २७ मे २०१८

* इंग्लिश प्रीमियर लीगमधील बलाढ्य लिव्हर संघाला धूळ चारत रियल माद्रिद सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन लीगच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल. रियल मॅड्रिडने ३-१ ने लिव्हरपूलचा धुव्वा उडवून विजेतेपद पटकावलं.

* युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये चॅम्पियन लीग फुटबॉल सामन्याची अंतिम फेरी पार पडली. रियल मॅड्रिडने जिंकलेला हा १३ वा युरोपियन किताब आहे.

* चॅम्पियन लीगच्या अंतिम फेरीत फर्स्ट हाफमध्ये कोणत्याच संघाला गोल करण्यात यश आलं नाही. सामन्याच्या सुरवातीलाच लिव्हरपूलचा मेन स्ट्रायकर मोहम्मद सालह दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाला मोठा फटका बसला.

* ५१ व्या मिनिटाला रियल मॅड्रिडच्या करीम बेन्झेमाने पहिला गोल केला. ५५ व्या मिनिटाला लिव्हरपूल सदिओ मेनने एक गोल झळकावल्याने सामना बरोबरीच्या वळणावर आला.

* त्यानंतर गॅरेथ बेलच्या किकमुळे रियल मॅड्रिडचा दुसरा गोल झाला. ८३ व्या मिनिटाला आणखी एक गोल करून बेलने रियल रियल मॅड्रिडला जेतेपद मिळवून दिले. लिव्हरपूलच्या गोलकिपरच्या चुका संघाला भोवल्याचं पाहायला मिळाले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.