सोमवार, २८ मे, २०१८

चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन - २८ मे २०१८

चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन - २८ मे २०१८

* चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैद्राबादचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळविला आहे. चेन्नईने याआधी २०१० व २०११ साली आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

* शतकी खेळी करणारा सलामीचा शेण वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ११७ धावांची नाबाद खेळी केली आहे. याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार दिला आहे.

* विजेता संघाला बक्षीस आणि रोख रक्कम - चेन्नई विजेत्या संघाला २० कोटी आणि ट्रॉफी, तर हैद्राबाद संघाला १२.५ कोटी मिळाले आहेत. केन विलयमसन ऑरेंज कॅप याला प्रत्येकी १२ लाख आणि ट्रॉफी, अँड्र्यू टाय याला १० लाख आणि ट्रॉफी.

* आयपीएल २०१८ मधील काही विक्रम

* आयपीएलच्या अंतिम फेरीत धावसंख्येचा पाठलाग करताना शतक झळकावनारा शेन वॉटसन हा पहिला खेळाडू ठरला आहे. वृद्धीमन सहाने याआधी २०१४ साली आयपीएलच्या अंतिम फेरीत शतक झळकावले होते.

* मात्र सहाचा किंग्स इलेव्हन पंजाब संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता. एखाद्या संघाने एका संघाला एकाच हंगामात आतापर्यंत ४ वेळा पराभूत केले नव्हते.

* २०१८ साली चेन्नई सुपर किंग्सने ही किमया साधली होती. साखळी फेरीत दोनदा, एकदा कॉलीफ्लायर सामन्यात व एकदा अंतिम फेरीत चेन्नईने हैद्राबादवर मात केली आहे.

* रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत ४ आयपीएल विजेतेपद जमा होणार आहे.  ३ वेळा मुंबई इंडियन्स, १ वेळा डेक्कन चार्जर्स या पंक्तीत आता अंबाती रायडू आणि हरभजनसिंग यांनाही स्थान मिळाले आहे.

* धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक स्टॅम्पिंग करणारा विकेटकिपर ठरला आहे. धोनीने विकेटच्या मागे आतापर्यंत ३३ स्टॅम्पिंग केल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.