मंगळवार, २९ मे, २०१८

पिंपरी चिंचवडला नवीन पोलीस आयुक्तालय - २९ मे २०१८

पिंपरी चिंचवडला नवीन पोलीस आयुक्तालय - २९ मे २०१८

* सोमवारी पिपंरी चिंचवडसाठी शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्याची अधिसूचना शासनाकडून जारी करण्यात आली.

* पुणे शहराप्रमाणे पिपंरी चिंचवड शहर हे महत्वाचे असल्याने या शहरासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा अधिकारी नेमण्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले. 

* वाढती गुंडगिरी, औद्योगिक क्षेत्रातील खंडणीखोरी, नागरिकांच्या वाहनांची तोडफोड अशा घटनांमुळे पिंपरीतील कायदा सुव्यवस्था समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

* आता नवीन आयुक्तालयासाठी २ हजार ६३३ नवीन पदे निर्माण करावी लागतील. याबाबतचा प्रस्ताव १ मार्च रोजी शासनाकडे सादर करण्यात आला.

* नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे या शहरातील पोलीस आयुक्त अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे आहेत. राजकीय दृष्ट्या संवेदनशील, औद्योगिक, पट्टा या बाबी विचारात घेऊन या ठिकाणीही महासंचालक दर्जाचा अधिकारी नेमण्याचे आव्हाहन केले आहे.

* पुणे शहर पोलीस दलात असलेले वाकड, सांगवी, पिपंरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, दिघी, हिंजेवाडी या पोलीस ठाण्यांचा समावेश पिपंरी आयुक्तालयात करण्यात येणार आहे.

* पुणे ग्रामीण पोलीस दलातील चाकण, आळंदी, देहूरोड तळेगाव, एमआयडीसी हा भाग समाविष्ट करण्यात येणार आहे. नवीन आयुक्तालयात एकूण मिळून १५ पोलीस ठाणी राहणार आहे.  ग्रामीण तसेच पुणे शहर दलातील कर्मचारी नवीन आयुक्तालयात वर्ग केले जाणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.