रविवार, २० मे, २०१८

देशात सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी - २१ मे २०१८

देशात सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी - २१ मे २०१८

* कापूस गाठीच्या उत्पादनाप्रमाणे सुताच्या उत्पादनातही भारत आघाडीवर असून चीनपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे पाच हजार ८०० दशलक्ष किलो सूत उत्पादनाचा अंदाज आहे.

* याचवेळी देशांतर्गत क्षेत्रात सूत उत्पादनात तामिळनाडू नंतर गुजरात आघाडी घेत आहे. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत यंदाही सूत उत्पादनात जगात अग्रस्थानी असणार आहे.

* देशात सुमारे २४०० सूतगिरण्या आहेत. यातील जवळपास १४८ गिरण्या गुजरातमध्ये आहेत. तामिळनाडूमध्ये सुमारे १८८ गिरण्या आहेत. तर महाराष्ट्रात खासगी आणि सहकारी मिळून १३३ सूतगिरण्या आहेत.

* तामिळनाडू लगतच्या भागातील गिरण्यांना मिळून यंदाही एक कोटी गाठींची [एक गाठ १७० किलो रुई] गरज आहे. गुजरातमध्ये मागील दोन वर्षात अत्याधुनिक प्रकारच्या व अधिक उत्पादन क्षमतेच्या ६८ सूतगिरणी सरकारच्या सहकार्याने उभ्या राहिल्या आहेत.

* त्यामुळे मागील दोन वर्षात व यंदाही गुजरातमध्ये गाठींची मागणी किंवा कन्झमशन वाढली आहे. देशात यंदा दर महिन्याला सूतगिरण्या व इतर युनिट्समध्ये मिळून २८ लाख गाठींचा वापर सूतनिर्मितीसाठी झाला आहे.

* तर दर महिन्याला चार कोटी किलो सुताचे उत्पादन झाले आहे. चीनसह आखाती देशामध्ये सूत निर्यात सुरु असून, यंदा टेरी टॉवेल चादरी आदींसाठी वापरात येणाऱ्या जाड कोर्स सुताची निर्यात सुमारे १२ टक्क्यांनी वाढली आहे.

* तर बारीक प्रकारचे सूत फाईन देखील चीनमध्ये पाठविले जात असल्याचे सांगण्यात आले. ३६० लाख गाठी देशांतर्गत सूतगिरण्या व लघुउद्योगाची गरज, २८ लाख गाठी दर महिन्याला देशांतर्गत सूतगिरण्यांमध्ये वापर, ३७० लाख गाठी देशात उत्पादनाचा अंदाज, २७५ लाख गाठी देशांतर्गत सूतगिरण्या मिलची गरज आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.