रविवार, २० मे, २०१८

तामिळनाडू भारतातील सर्वात भ्रष्ट राज्य - १९ मे २०१८

तामिळनाडू भारतातील सर्वात भ्रष्ट राज्य - १९ मे २०१८

* तामिळनाडू हे देशातील  सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचे सीएमएस-इंडियाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. तसेच देशातील १३ मोठ्या राज्यामध्ये केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

* संबंधित राज्यातील नागरिकांची सरकारी कर्मचाऱ्याबद्दलची मते, लाच मागण्याचे प्रमाण, भ्रष्टाचारविरोधी चळवळी आदी विविध स्वरूपाचे प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरावरून सर्वाधिक भ्रष्टाचारविरोधी चळवळी आदी विविध स्वरूपाचे प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले.

* त्यांनी दिलेल्या उत्तरावरून सर्वाधिक भ्रष्ट आणि कमीत कमी भ्रष्ट राज्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

* त्यामध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर तर तेलंगना दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरकारी कामासाठी तेलंगणातील नागरिकांना ७३% लाच द्यावी लागते.

* त्याचबरोबर पंजाब, गुजरात, आंध्रप्रदेश येथेही भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.