शनिवार, १९ मे, २०१८

भारतात प्रदूषणामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रदूषण - १९ मे २०१८

भारतात प्रदूषणामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रदूषण - १९ मे २०१८

* गावातील हवा शुद्ध असते, असा समज असतो, पण हा समजच असतो, पण हा समज खोटा ठरविणारा निष्कर्ष अमेरिकेच्या संशोधकांनी जाहीर केला आहे.

* त्यानुसार भारतात वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण ग्रामीण व शहरी अशा दोन्ही ठिकाणी समान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

* भारतात ग्रामीण भागात राहणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने साहजिकच हवेच्या प्रदूषणामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या शहरापेक्षा जास्त दिसते. असे संशोधकांनी म्हटले आहे.

* उत्तर भारतातील प्रदूषित शहरापेक्षा जाणवणाऱ्या परिणामांचा अभ्यास करताना ग्रामीण व शहरी असे वर्गीकरण करण्यात आले होते.

* वायू प्रदूषणावर जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात ही माहिती दिली आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे विंध्य पर्वतराजीच्या उत्तर भागातील आहेत.

* कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी विस्कॉनसिन मॅडिसन विद्यापीठ आणि बोस्टन विद्यापीठाच्या सहकार्याने शहरापेक्षा गावामध्ये प्रदूषणाचे बळी जास्त असतात. या संबंधीचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी ग्रामीण भारतावर लक्ष केंद्रीत केले होते.

* ग्रामीण व शहरी भागात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण समान, शहरामध्ये १० हजार लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण ६.४, तर ग्रामीण भागात ५.६.

* ग्रामीण भागात हृदयरोगामुळे मृत्यू १.६१ लाख पक्षाघातामुळे मृत्यू ९० हजार, फुफ्फुसांचे विकार व फुफ्फुसांचा कर्करोगामुळे मृत्यू होतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.