गुरुवार, १० मे, २०१८

भारताचा विकासदर ७.८ टक्के विकासदर होणार - १० मे २०१८

भारताचा विकासदर ७.८ टक्के विकासदर होणार - १० मे २०१८

* भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ चालू आर्थिक वर्षात ७.४ टक्के राहील आणि पुढील आर्थिक वर्षात ती ७.८ टक्क्यापर्यंत जाईल. असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीने आयएमएफ व्यक्त केला आहे.

* आयएमएफच्या आशिया आणि प्रशांत विभागाच्या आर्थिक पाहणी अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्थेतील नोटबंदी आणि वस्तू व सेवा कराचा प्रतिकूल परिणाम संपत आला आहे.

* चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थाची वाढ ७.४ टक्के राहील आणि पुढील आर्थिक वर्षात ती ७.८ टक्क्यापर्यंत पोचेल. चीनच्या अर्थव्यवस्थेची वाढ चालू आर्थिक वर्षात ६.६ टक्के आणि पुढील आर्थिक वर्षात ६.४ टक्के राहील.

* आशिया हे जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रमुख इंजिन या पुढील काळात कायम राहणार आहे. जागतिक वाढीपैकी तीन चतुर्थांश वाढ फक्त चीन आणि भारतातील असेल.

* मात्र जागतिक पातळीवरील स्वकेंद्री धोरणे, वयोवृद्ध लोकसंख्येतील वाढ, उत्पादन क्षेत्राची मंदावलेली गती आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा उदय हे घटक अडसर ठरतील असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.