बुधवार, ३० मे, २०१८

भूमिहीन नागरिकांसाठी कर्मवीर दादासाहेब सबलीकरण व स्वाभिमान योजना - ३० मे २०१८

भूमिहीन नागरिकांसाठी कर्मवीर दादासाहेब सबलीकरण व स्वाभिमान योजना - ३० मे २०१८

* कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्यरेषेखालील भूमिहीन लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्द करून देण्यासाठी जमीन मालकाला रेडीरेकनर दराच्या दुपटीपर्यंत मोबदला देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.

* अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे राहणीमान उंचावण्यासह त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्द करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते.

* याअंतर्गत संबंधित समाजातील दारिद्ररेषेखालील आणि भूमिहीन शेतमजुर कुटुंबाना चार एकर कोरडवाहू किंवा २ एकर बागायती जमीन उपलब्द करून देण्यात येते.

* जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी ५०% रक्कम बिनव्याजी कर्ज व ५०% रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वर्ष २०१२ मध्ये केलेल्या बदलानुसार जिल्ह्याधिकारांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रथम प्रचलित रेडी रेकनरच्या किमतीप्रमाणे जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करेल.

* रेडीरेकनरच्या किमतीप्रमाणे जमीन उपलब्द होत नसल्यास जमिनीच्या मूल्याबाबत संबंधित जमीन मालकाशी वाटाघाटी करण्यात येईल. त्यानुसार रेडीरेकनरची किंमत २० टक्क्यापर्यंत प्रथम वाढ देण्यात येईल.

[ मंत्रिमंडळाचे इतर निर्णय ]

* राज्यातील ग्राहकांच्या हितासाठी स्वस्त धान्य दुकानातून सध्या विक्री करण्यात येत असलेल्या तूरडाळीच्या प्रतिकिलो ५५ रुपयांच्या दरात सुधारणा करण्यात आली असून आता प्रतिकिलो ३५ रुपयांप्रमाणे विक्री करण्यास मान्यता देण्यात आली.

* नागपूर-मुंबई शीघ्र संचार द्रुतगती मार्ग [महाराष्ट्र समृद्धी महामार्ग] या प्रकल्पासाठी राज्य शासन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे लिमिटेड एसपीव्ही या संस्थांमध्ये करारनामा करण्यात मान्यता देण्यात आली.

* साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी महामंडळाची जागा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.