रविवार, २० मे, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - २० मे २०१८

काही नवीन चालू घडामोडी - २० मे २०१८

* भारतीय वंशाचे सैद्धांतिक भौतिकशास्त्र प्रा ई सी जॉर्ज सुदर्शन यांचे १४ मे रोजी अमेरिकेतील टेक्सस येथे निधन झाले. 

* देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी हुकल्याने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश जस्ती चेलमेश्वर १८ मे रोजी न्यायालयीन कामकाजातून निवृत्त झाले. 

* भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष हिमांता बिस्वा सरमा यांची निवड आशियाई बॅडमिंटन महासंघाच्या उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे.  

* वारली चित्रशैलीला आधुनिक कलेत मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या जिव्या सोमा मशे यांचे १५ मे रोजी वयाच्या ८४ व्या निधन झाले.  

* त्रिपुराची राजधानी आगरताळा आणि बांगलादेशातील अखुरा हे गाव आता रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे. टेक्समाको रेल या कंपनीला २०० कोटी रुपयांचे हे कंत्राट मिळाले आहे. 

* भारतीय संघाचे माजी खेळाडू लालचंद राजपूत यांची झिम्बॉबेच्या हंगामी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

* जनुक वैज्ञानिक व नामांकित वनस्पती जीवशास्त्रज्ञ डॉ जोआन कोरी यांना [ग्रबर जेनेटिक्स पुरस्कार] प्रदान करण्यात आला आहे.

* केंद्र सरकारने IAS अधिकारी अतानू चक्रवर्ती यांची गुंतवणूक व सार्वजनिक संपदा व्यवस्थापन येथील नवीन सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

* कोल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक [CMD] पदी अनिल कुमार झा यांची नेमणूक करण्यात आली आहे.

* शिवांगी पाठक या १६ वर्षीय मुलीने जगातले सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर २९००० फूट सर करून नवा इतिहास रचना आहे. ती एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला बनली आहे.

* शास्त्रज्ञानी जगातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृष्णविवराचा शोध घेतला आहे. हा कृष्णविवर प्रत्येक दोन दिवसामध्ये सूर्याच्या वजनाइतका वायू गिळंकृत करतो आहे.

* झारखंड मध्ये देवघर शहरात नवीन अखिल भारतीय वैद्यकीयशास्त्र संस्था [AIIMS] उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आपली मंजुरी दिली आहे.

* आंध्रप्रदेशमध्ये अनंतपूर जिल्ह्यात जनथालरू इथे केंद्रीय विद्यापीठ स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे.

* केंद्रीय मंत्रिमंडळाने भोपाळमध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात ही देशातली पहिली राष्ट्रीय संस्था असेल.

* क्युबामध्ये बोईंग ७१७ प्रवासी जेट विमान कोसळून सुमारे १०० हुन अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

* फोर्ब्स मॅगझिनने अरब देशातील शंभर यशस्वी भारतीयांच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत अल अदिल समूहाचे प्रमुख, मसाला किंग धनंजय दातार यांना तिसावे स्थान मिळाले आहे.

* ब्रिटनचे धाकटे युवराज प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघान मर्केल आज अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.