शुक्रवार, ४ मे, २०१८

लष्करावर खर्च करणाऱ्याच्या यादीत भारत जगात पहिल्या ५ मध्ये - ३ मे २०१८

लष्करावर खर्च करणाऱ्याच्या यादीत भारत जगात पहिल्या ५ मध्ये - ३ मे २०१८

* लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप ५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. भारत आता अमेरिका आणि चीन यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. मात्र संरक्षण खात्याचा बहुतांशी खर्च वेतन व निवृत्ती वेतनावरच होतो.

* स्टोकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने सिप्री जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की २०१७ मध्ये भारताचा लष्करावरील खर्च ५.५ टक्क्यांनी वाढून ६३.९ अब्ज डॉलरवर गेला.

* भारताचा लष्करी खर्च आता फ्रान्सपेक्षा अधिक झाला. अहवालात म्हटले आहे की जगाचा लष्करावरील खर्ज अल्प प्रमाणात वाढून १.७३ लाख कोटीवर गेला आहे.

* हा खर्च जागतिक सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.२% आहे. लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात अमेरिका आणि चीनचा दबदबा कायम आहे.

* अमेरिकेचा लष्करावरील खर्च ६१० अब्ज डॉलर तर चीनचा दबदबा कायम आहे. अमेरिकेचा लष्करावरील खर्च ६१० अब्ज डॉलर तर चीनचा २२८ अब्ज डॉलर आहे.

* सिप्रीने म्हटले आहे की चीन, भारत, आणि सौदी अरेबिया यांचा लष्करावरील खर्च वाढल्यामुळे लष्करी समतोल आता आशिया यांच्या बाजूने झुकला आहे. आशियात चीनचा लष्करी खर्च सर्वाधिक आहे.

* चीनचा लष्करी खर्च २०१७ मध्ये जागतिक लष्करी खर्चाच्या तुलनेत वाढून १३% झाला. तो २००८ मध्ये ५.८% होता. लष्करी खर्च वाढल्यामुळे चीनचा वृद्धिदर कमी झाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.