मंगळवार, १५ मे, २०१८

सुप्रसिद्ध लावणी गायिका यमुनाबाई वाईकर -१५ मे २०१८

सुप्रसिद्ध लावणी गायिका यमुनाबाई वाईकर - १५ मे २०१८

* सुप्रसिद्ध लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांचे आज अल्प आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर वाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 *यमुनाबाई यांचा जन्म ३१ डिसेंबर १९१५ रोजी वाई येथे झाला होता. घरातच त्यांना लावणी व तमाशाचे बाळकडू मिळाले होते. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी स्वतःचा तमाशा फड काढला होता.

* यमुना हिरा तारा वाईकर संगीत पार्टी अशा नावाने यमुनाबाईंनी आपल्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र  गाजवला. महाराष्ट्रात गाजलेल्या अनेक फक्कड लावण्या त्यांनी तयार केल्या.

* ठुमरी, तराणा, गझल आदी संगीतप्रकार त्या सहजतेने गात असतं. त्यांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लावणी सम्राज्ञी पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, संगीत क्षेत्रात अतिशय मानाचा समजल्या जाणाऱ्या पदमश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

* सुमारे २२ राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. मराठी तमाशा क्षेत्रात त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचे काम यमुनाबाई वाईकर यांनी केलेले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.