शुक्रवार, २५ मे, २०१८

डी कुमारस्वामी कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री - २४ मे २०१८

डी कुमारस्वामी कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री - २४ मे २०१८

* कर्नाटकमधील सत्तासंघर्षानंतर जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी मुख्यमंत्री म्हणून तर काँग्रेसचे जी परमेश्वर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

* त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार के आर रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. काँग्रेस जेडीएसच्या नेत्यांपैकी झालेल्या बैठकीत एकूण ३४ खात्यांपैकी २२ खाती काँग्रेसला तर मुख्यमंत्रीपदासह १२ खाती जेडीएसला देण्याबाबत निर्णय झाला.

* २४ मे रोजी त्यांना विधानसभेत बहुमत चाचणी होणार असून त्यानंतर मंत्र्यांना खाते वाटप केले जाईल. परमेश्वर हे काँग्रेसचे दलित नेते असून काँग्रेसचेच रोशन बेग यांच्या नावाची यापूर्वी उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चा होती.

* त्याच्याआधी उपमुख्यमंत्रीपद हे लिंगायत समाजाच्या आमदाराला देण्यात यावे अशी मागणी केली होती. अखेर काँग्रेस आणि जेडीएस नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसने ही जबाबदारी दलित नेते पी परमेश्वर यांच्याकडे देण्याचे निश्चित केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.