शुक्रवार, १८ मे, २०१८

२०५० पर्यंत देशातील ४१ कोटी जनता शहराकडे वळणार - १८ मे २०१८

२०५० पर्यंत देशातील ४१ कोटी जनता शहराकडे वळणार - १८ मे २०१८

* झपाट्याने वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे शेकडो लोक रोजगार आणि चांगल्या आयुष्याच्या शोधात खेड्यामधून शहराकडे वळत आहेत. हा वेग पाहता २०५० पर्यंत देशातील ४१ कोटीहून अधिक लोकसंख्येचे शहरीकरण होणार आहे.

* तर सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत २०२८ पर्यंत राजधानी दिल्ली जपानच्या टोकियो शहराला मागे टाकेल. एकंदरीत पाहता २०५० पर्यंत जगातील २/३ लोकसंख्येचे शहरीकरण होणार असल्याची चिंताजनक माहिती संयुक्त राष्ट्र अर्थात यूएनने आपल्या अहवालातून दिली आहे.

* संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाने शहरीकरणावर एक अहवाल जाहीर केला. त्यानुसार जगातील २/३ लोक २०५० दरम्यान होणाऱ्या एकूण शहरीकरणामध्ये या तिन्ही देशांचा वाटा ३५ टक्क्याच्या जवळपास असेल.

* शहरीकरणाचे हे प्रमाण भारतामध्ये ४१.६ कोटी, चीनमध्ये २५.५ कोटी, नायजेरियामध्ये १८.९ कोटी इतके असेल. जागतिक शहरीकरणामध्ये मागील काही दशकात झपाट्याने वाढ झाली.

* जगातील ७५ कोटी लोक शहरात राहत होते. त्यात आता २०१८ मध्ये ४.२ अब्जाच्या घरात गेला आहे. २०१५ पर्यंत ही वाढ ६८ टक्क्यापर्यंत वाढली जाणार आहे.

* तर लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली शहर जपानची राजधानी टोकियोला मागे टाकणार आहे. अहवालानुसार सध्याला टोकियोची लोकसंख्या ३.७ कोटी आहे.

* यानंतर २.९ कोटीसह दिल्लीचा क्रमांक लागतो. यापाठोपाठ चीनच्या शांघाई शहराची लोकसंख्या २.६ कोटी आहे. तर मेक्सीको सिटी व साओ पाउलो संख्या प्रत्येकी दोन कोटी २० लाख आहे. तर कैरो, मुंबई, बीजिंग आणि ढाका या शहरांची संख्या कोटीच्या घरात आहे.

* लोकसंख्येला बाबतीत राजधानी दिल्ली २०२८ पर्यंत टोकियो मागे टाकेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे मेगासिटीच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.

* १९९० मध्ये फक्त १० मेगासिटी होत्या. सध्याला ३३ मेगासिटी असून २०३० पर्यंत हा आकडा ४३ होणार आहे. प्रामुख्याने विकसनशील देशामध्ये मेगासिटीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.