गुरुवार, ३१ मे, २०१८

एमपीएससीत रोहितकुमार राजपूत राज्यात प्रथम - ३१ मे २०१८

एमपीएससीत रोहितकुमार राजपूत राज्यात प्रथम - ३१ मे २०१८

* राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत एमपीएससी पुण्यातील रोहितकुमार राजपूत याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमधून रोहिणी नऱ्हे हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या दोघांचीही उपजिल्हाधिकारी पदावर निवड करण्यात आली आहे. 

* राज्य सरकारने २०१७ मध्ये उपजिल्हाधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपाधीक्षक, विक्रीकर सहायक आयुक्त या महत्वाच्या पदासह विविध पदासाठी परीक्षा घेतली होती.

* या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. रोहितला ५९९ गुण मिळाले आहेत. सुधीर पाटील दुसरा आला असून त्याला ५७२ गुण मिळाले आहेत. 

* ओबीसी प्रवर्गातून दत्तू शेवाळे ५६६ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे. अनुसूचीत जाती प्रवर्गातून प्रसन्नजीत प्रधान ५३१ गुण मिळवून पहिला आला आहे.

* गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेतून १४ उमेदवाराची उपजिल्हाधिकारी, पाच उमेदवाराची पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि विक्रीवर विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी ४१ उमेदवाराची निवड झाली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.