सोमवार, ७ मे, २०१८

गायक अरुण दाते यांचे निधन - ६ मे २०१८

गायक अरुण दाते यांचे निधन - ६ मे २०१८

* शुक्रतारा मंद वारा, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे अशा हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन झाले.

* अरुण दाते गेल्या काही दिवसापासून आजारी होते आज पहाटे ६ वाजता त्यांनी कांजूरमार्ग येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षाचे होते.

* अरुण दाते यांचे वडील रामूभैया दाते इंदोरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवले.

* इंदोरच्या धारमध्ये कुमार गंधर्वकडे त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांनी पुढील शिक्षण के महावीर यांच्याकडे घेतले त्यानंतर १९५५ पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली.

* मंगेश पाडगावकर यांची रचना आणि श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या शुक्रतारा मंद वारा या गाण्याने त्यांना लौकिक मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही. १९६२ मध्ये त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.