शनिवार, १२ मे, २०१८

आज कर्नाटकात मतदान - १२ मे २०१८

आज कर्नाटकात मतदान - १२ मे २०१८

* मागील तीन महिन्यापासून कर्नाटकमध्ये सुरु असलेली प्रचाराची धुळवड गुरुवारी सायंकाळी थांबल्यानंतर आता उद्या १२ रोजी कन्नड जनता मतदानाचा हक्क बजावणार आहे.

* येथे खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये असली तरीसुद्धा माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या जेडीएस रूपाने तिसरा खेळाडूही मैदानात उतरला आहे.

* जेडीएस राज्यात किंगमेकर ठरू शकते. अशी शक्यता बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांची व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याखेपेस मतदारांना मोबाईल ऍपद्वारे मतदान केंद्रावरील माहिती कळू शकेल.

* कर्नाटकात ४.९६ कोटी मतदार आहेत. २.५२ कोटी पुरुष मतदार, २.४४ कोटी महिला मतदार, २६०० उमेदवार, ५५,००० हजार मतदान केंद्रे ३.५ लाख तैनात कर्मचारी.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.