शुक्रवार, ४ मे, २०१८

केंद्र सरकारची हवाई वाहतुकीसाठी नभ योजना - ३ मे २०१८

केंद्र सरकारची हवाई वाहतुकीसाठी नभ योजना - ३ मे २०१८

* भारतातील विमानतळांची क्षमता वाढविण्यासाठी दरवर्षी १ अब्ज उड्डाणाच्या क्षमतेसाठी नभ योजनेचे लॉन्चिंग करण्यात आले असून देशात प्रवासी हवाई वाहतुकीस प्रतिवर्षी ३०% वेगाने वाढ होणार आहे.

* भारतात देशांतर्गत प्रवासी हवाई वाहतुकीचा ३०% वेगाने विस्तार होत आहे. वाढती प्रवासी संख्या व वाढत चाललेली उड्डाणे लक्षात घेता केंद्र सरकारने देशातील विमानतळाची क्षमता पाच पटीने वाढवण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.

* भारतात दरवर्षी १ अब्ज देशांतर्गत उड्डाणे सुरळीतपणे पार पडावीत असा प्रस्तुत योजनेमागचा हेतू आहे. या महत्वकांक्षी प्रयत्नात खासगी गुंतवणूक, एअर कनेक्टिव्हिटी आणि नियामक उपायांवर चर्चा करण्यासाठी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी खासगी वाहतूक विमान कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे.

* एअरपोर्ट कौंसिल इंटरनॅशनल अहवालानुसार २०४० पर्यत चीनला मागे टाकून नागरी हवाई वाहतुकीस भारत जगातील २ ऱी मोठी हवाई बाजारपेठ बनणार आहे.

* या योजनेत विमानतळाच्या क्षमतेत वाढ त्यांचा विस्तार विमानतळांशी संलग्न मेट्रो, बस, टॅक्सी, या परिवहन सेवेची कनेक्टिव्हिटी सेवा कशाप्रकारे वाढविल्या जातील. याची योजना तयार केली जाणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.