शनिवार, २६ मे, २०१८

भारतातील ८ राज्यात हिंदूंची कमी संख्या - २६ मे २०१८

भारतातील ८ राज्यात हिंदूंची कमी संख्या - २६ मे २०१८

* देशातील ८ राज्यातील हिंदूंना अल्पसंख्यांक म्हणून दर्जा द्यावा का याचा निर्णय राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या १४ जूनच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

* सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्यांला या प्रश्नासाठी आयोगाने जाण्याचे ठरविले. जम्मू काश्मीर, पंजाब, लक्षद्वीप, मिझोराम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मणिपूर या आठ राज्यामध्ये हिंदूंचे प्रमाण अन्य धर्मगट व समाज यांच्यापेक्षा कमी आहे.

* त्यामुळे तेथील हिंदू समाजाला अल्पसंख्याक म्हणून घोषित करून तास अधिकार देण्यात यावा. अशा आशयाच्या मागणीची भाजपने अश्विनीकुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

* केंद्र सरकारने देशात १९९६ साली मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, व पारशी धर्मियांना अल्पसंख्यांकाचा दर्जा दिला जातो. आणि २०१४ साली या यादीत जैनाचाही समावेश करण्यात आला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.