मंगळवार, २९ मे, २०१८

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद - २९ मे २०१८

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद - २९ मे २०१८

* औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी नांदेडचे परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती करण्यात येते. ते लवकरच आपला पदभार स्वीकारतील. 

* गेल्या अनेक दिवसापासून औरंगाबादसारख्या संवेदनशील शहराला पूर्णवेळ पोलीस आयुक्त नव्हता. मिटमिट्यातील कचरा प्रश्नाने हिंसक रूप घेतल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

* त्यानंतर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.

* औरंगाबादमध्ये नुकतेच दोन समाजामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. शहराला पूर्णवेळ पोलीस आयुक्त देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.