शुक्रवार, ४ मे, २०१८

पत्रकार जे डे खुनाबद्दल छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा - २ मे २०१८

पत्रकार जे डे खुनाबद्दल छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा - २ मे २०१८

* मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर सडेतोड लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे उर्फ जे डे यांचा सुमारे सात वर्षांपूर्वी सुपारी देऊन खून केल्याबद्दल येथील विशेष न्यायालयाने बुधवारी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन आणि त्याचा नेमबाज शुटर सतीश कालियासह एकूण ९ आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

* जून २०११ रोजी पवई येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयने ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकारी पक्षाने एकूण १५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. 

* पत्रकार जिना वोरा व पॉलसन जोसेफची निर्दोष सुटका झाली आहे. दीपक सिसोदियाला वगळून इतर आरोपीना प्रत्येकी २७ लाख ३५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी ५ लाख रुपये डे यांची बहीण लीना यांना द्यावेत असे आदेशही दिले आहेत.

* दि ११ जून २०११ रोजी जे डे यांचा खुन त्यांच्या काही दिवस अगोदर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे झाला. असे सीबीआयचे म्हणणे होते. त्यापैकी कासकावरील हल्ल्यामागे राजनचा हात होता. अंडरवर्ल्डच्या कमाईचा जास्तीत जास्त हिस्सा आपल्याला मिळावा यासाठी निराश झालेल्या व म्हातारा होत असलेल्या राजनने हा गोळीबार केला असावा असे सूत्रांनी वाटते. 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.