शुक्रवार, ११ मे, २०१८

शेतकऱ्यांना अनुदान देणारी 'रयत बंधू' देशातील पहिली योजना - ११ मे २०१८

शेतकऱ्यांना अनुदान देणारी 'रयत बंधू' देशातील पहिली योजना - ११ मे २०१८

* तेलंगणामधील शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकारने बहुचर्चित 'रयत बंधू' या विशेष योजनेस आजपासून सुरवात केली. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या योजनेची घोषणा केली. 

* या योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वार्षिक ८००० रुपये दरवर्षी अनुदान देणारी देशातील पहिली योजना म्हणून 'रयत बंधू' कडे पहिले जात आहे. याकरिता अर्थसंकल्पात १२ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. 

* करीमनगर जिल्ह्यातील हुजुराबाद मंडल येथील इंदिरानगर येथे एका रंगारंग कार्यक्रमात मुख्यमंत्री राव यांनी योजनेचे अनावरण केले आहे. जिल्ह्यातील धर्मराजपल्ली गावात मुख्यमंत्र्यांनी अनुदानाच्या धनादेशांचे अल्पभूधारक शेतकऱ्यांना वितरण करून योजनेस प्रारंभ केला. 

* रयत बंधू योजनेसह 'पत्तादार पासबुक' हे अत्याधुनिक ओळखपत्र राज्यातील सर्व शेतकऱ्याकरीता सादर केले आहे. 

* राज्यातील ५८ लाख शेतकऱ्यांना १७ सुरक्षा वैशिष्ट्यासह पत्तादार पासबुक अर्थात टायटल डिड मिळणार असून याअंतर्गत अनुदानाचे धनादेश वितरणासह प्रारंभ करण्यात आला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.