मंगळवार, २२ मे, २०१८

ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - २२ मे २०१८

ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - २२ मे २०१८

* भारताने २१ मे रोजी ब्राम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्राचा कार्यअवधी १० ते १५ वर्षे वाढवणे हा या चाचणीमागचा मुख्य उद्देश आहे.

* ओडिशाच्या किनारपट्टीवर चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रातून मोबाईल लॉन्चरवरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

* भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे. सुमारे १० ते १५ वर्षापर्यंत कालावधी वाढवलेले ब्राह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे.

* ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीमुळे  भारतीय सशस्त्र दलात सामील होणाऱ्या क्षेपणास्त्राच्या निर्मिती खर्चात मोठी बचत होणार आहे.

* भारतीय लष्कराने आपल्या शस्त्रागारात ब्राह्मोसचा तीन रेजिमेंट यापूर्वी समावेश केला आहे. सर्व क्षेपणास्त्रे ही ब्लॉक -३ यंत्रणेने सज्ज आहेत.

* भारतीय लष्कराकडून ब्राह्मोसचा जमिनीवरून हल्ला करणाऱ्या श्रेणीचा २००७ पासून वापर केला जातो. या क्षेपणास्त्राचे वैशिट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर स्वतःवर आणि खाली उड्डाण करून जमिनीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता यात आहे. त्याचबरोबर शत्रूच्या हवाई रक्षा प्रणालीपासून हे सुरक्षित राहू शकेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.