सोमवार, १४ मे, २०१८

हवाई टॅक्सीसाठी उबारचा नासासोबत करार - १३ मे २०१८

हवाई टॅक्सीसाठी उबारचा नासासोबत करार - १३ मे २०१८

* मोबाईल ऍप्लिकेशन टॅक्सी बुक करून प्रवास करण्यासाठी प्रसिद्ध असणारी उबर या कंपनीने अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेशी हातमिळवणी केली आहे. 

* नासाच्या मदतीने ही कंपनी आपल्या उडणाऱ्या टॅक्सी बाजारात आणणार आहे. तसेच या अनोख्या सेवेचा दरही सामान्य टॅक्सी सेवेइतकाच असेल. असेही कंपनीकडून सांगण्यात आले. 

* अंतराळ कायद्याअंतर्गत उबरने नासासोबत करार केला आहे. शहरी हवाई वाहुतक सेवा देण्याचे मॉडेल यामध्ये तयार केले जाणार आहे. 

* उबर एअर पायलट नावाच्या या योजनेत लॉस एंजिल्सदेखील भागीदार असणार आहे. याआधी डलास फोर्ट वर्थ, टेक्सस आणि दुबई देखील यात सहभागी झाले आहेत.

* २०२० पर्यंत अमेरिकेतील काही शहरात उबर हवाई विमान सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.