गुरुवार, ३१ मे, २०१८

देशात विदेशी पर्यटकांची ३७ टक्क्यांची वाढ - ३० मे २०१८

देशात विदेशी पर्यटकांची ३७ टक्क्यांची वाढ - ३० मे २०१८

* इटुरिस्ट व्हिसामुळे प्रणालीमुळे विदेशी पर्यटकांचे भारतातील आगमन सोपे झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात पर्यटकांची संख्या ३७.२ टक्के वाढली. ब्युरो ऑफ इमिग्रेशन आकडेवारीतून हे स्पष्ट झाले.

* विदेशी पर्यटकांना विमानतळावर उतरताच तात्काळ व्हिसा देण्याची सुविधा केंद्रीय पर्यटन विभागाने सुरु केली आहे. यामुळे एप्रिल २०१८ मध्ये १.५७ लाख विदेशी पर्यटक भारतात येऊ शकले.

* हा आकडा मागील वर्षी याच महिन्यात १.१४ लाख होता. जानेवारी ते एप्रिल दरम्यानही पर्यटकांच्या संख्येत ५७.२ टक्के वाढ झाली आहे.

* पर्यटकांची सर्वाधिक पसंती नवी दिल्लीला होती. एकूण पर्यटकांनी ४६.२% पर्यटक नवी दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर १७.४% पर्यटकांनी मुंबईला पसंती दिली.

* भारतात पर्यटकांसाठी येणाऱ्या १५ अव्वल देशामध्ये गोरा साब अशी ओळख असलेल्या ब्रिटिश पर्यटकांची संख्या एप्रिल २०१८ मध्ये सर्वाधिक आहे. एकूण पर्यटकांपैकी १६.३ पर्यटक ब्रिटनने होते.

* त्यानंतर अमेरिकेतील ११ व चीनमधील ५.८ टक्के लोक पर्यटक भारतात आले. सर्वात कमी १.८ टक्के पर्यटक दक्षिण कोरियात होते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.