बुधवार, २३ मे, २०१८

ए बी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त - २३ मे २०१८

ए बी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त - २३ मे २०१८

* दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हीलियर्सने धक्कादायकरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

* डिव्हिलियर्सने अचानक घेतलेल्या या निवृत्तीमुळे क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा डिव्हिलियर्स मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू मारण्यात पटाईत होता.

* कसोटी रेकॉर्ड - एबीने १७ डिसेंबर २००४ रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले. त्याने शेवटचा सामना ३० मार्च २०१८ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे. आंतरराष्ट्रीय ११४ कसोटी सामन्यात एबीने २२ शतक आणि ४६ अर्धशतके ८७६५ धावा केल्या आहेत.

* एकदिवसीय रेकॉर्ड - एबीने २ फेब्रुवारी २००५ रोजी इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल वन डेतुन एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने शेवटचा वनडे सामना भारताविरुद्धच १६ फेब्रुवारी २०१८ रोजी खेळला.

* वनडे मध्ये त्याने २२८ सामन्यात, २५ शतके, आणि ५३ अर्धशतके यांच्यासह ९५७७ धावा केल्या आहेत.

* २०-२० मध्ये एबीने २४ फेब्रुवारी २००६ रोजी पदार्पण केले. त्याने शेवटचा २०-२० सामना २९ ऑक्टोबर २०१७ रोजी खेळला. डिव्हिलियर्सने ७८ २०-२० सामन्यात १० अर्धशतकासह १६७२ धावा केल्या आहेत.

* वेगाने शतक - दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने १८ जानेवारी २०१५ रोजी स्फोटक खेळी करत, नवा रेकॉर्ड केला. डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे सामन्यात अवघ्या ३१ चेंडूत शतक ठोकले होते.

* या सामन्यात डिव्हिलियर्सचे ४४ चेंडूत नऊ चौकार आणि तब्बल १६ षटकारासह १४९ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर डिव्हिलियर्सने ४४ चेंडूत शतक ठोकले होते. वन डे सामन्यात हा नवा रेकॉर्ड होता.

* त्यानंतर एबीने २०१५ साली रोजी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ६६ चेंडूत १६२ धावांची वादळी खेळी केली होती. त्यानंतर ५२ चेंडूत १०० धावा काढून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शतक आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.