मंगळवार, २९ मे, २०१८

नासिरूल मुल्क पाकिस्तानचे नवे काळजीवाहू पंतप्रधान - २९ मे २०१८

नासिरूल मुल्क पाकिस्तानचे नवे काळजीवाहू पंतप्रधान - २९ मे २०१८

* पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश नासिरूल मुल्क यांचे नाव देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले. या घोषणेमुळे सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गट आणि विरोधकांमध्ये असलेला राजकीय वाद संपुष्टात आला.

* पाकिस्तानमध्ये २५ जुलैला सार्वत्रिक निवडणूक नियोजीत आहेत. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपत आहे. त्यामुळे नसिरूल मुल्क हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत साधारण अडीच महिने काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळतील.

* विरोधी पक्षनेते खुर्शीद शाह आणि विद्यमान पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांनी आज पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. मुल्क हे १ जूनला शपथ घेतील.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.