बुधवार, १६ मे, २०१८

न्यूड चित्रपटाला न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान - १६ मे २०१८

न्यूड चित्रपटाला न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान - १६ मे २०१८

* रवी जाधव दिग्दर्शित न्यूड या मराठी चित्रपटाने न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळविला आहे.

* तर याच चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कल्याणी मुळे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

* या महोत्सवाचे उदघाटन न्यूड या चित्रपटानेच करण्यात आले होते. या सन्मानामुळे पुन्हा एकदा मराठीचा झेंडा सातासमुद्रावर पकडला आहे.

* १८ व्या न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव अमेरिकेतील न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या व्हिलेज ईस्ट सिनेमा येथे ७ मे १२ मे दरम्यान पार पडला.

* या महोत्सवात न्यूडला दोन नामांकने होती. त्या दोन्ही नामांकनामध्ये चित्रपटाने पुरस्कार मिळविले. या महोत्सवाचा समारोप अभिनेता राजकुमार रावच्या [ओमेर्ता] या चित्रपटाने झाला.

* नग्न चित्रकलेसाठी मॉडेल बनणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. कल्याणी मुळे, छाया कदम, आणि मदन देवधर यांच्या या चित्रपटातून प्रमुख भूमिका आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.