रविवार, २७ मे, २०१८

दिल्ली मेरठ देशातील पहिला १४ पदरी महामार्ग - २६ मे २०१८

दिल्ली मेरठ देशातील पहिला १४ पदरी महामार्ग - २६ मे २०१८

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मेरठ देशातील पहिल्या १४ पदरी राष्ट्रीय महामार्गाचे उदघाटन करण्यात आले. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ९ च्या अंतर्गत येत असून याचे ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे असे नाव देण्यात आले आहे.

* महामार्गाची वैशिट्ये

* दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेच्या दिल्ली विभागातील ९ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचे उदघाटन करण्यात आले. दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवे हा देशातील पहिला १४ पदरी महामार्ग आहे.

* या महामार्गांतर्गत ५ फ्लायओव्हर, चार अंडरपास, आणि चार फूटओव्हटर ब्रिज अशी या महामार्गाची रचना आहे. यमुना नदीवरही दोन पूल बांधण्यात आले आहेत.

* अवघ्या १८ महिन्याच्या विक्रमी कालावधीत दिल्ली विभागातील या महामार्गाच बांधकाम पूर्ण झाल. यासाठी ९ किलोमीटरसाठी ८४२ कोटी एवढा खर्च आला. विशेष म्हणजे सौरऊर्जेचाही पुरेपुर वापर या प्रकल्पात करण्यात आला आहे.

* हा देशातील पहिला स्मार्ट आणि हरित एक्स्प्रेसवे आहे. या महामार्गामुळे दिल्लीतील वाहतूक कोंडी अर्ध्यावर येण्यास आणि प्रदूषणाची पातळी २७ टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

* १३५ किमी लांबीच्या या महामार्गासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. सौरऊर्जेद्वारे पथदिवे कार्यंवित होणारा देशातील पहिला महामार्ग आहे. दर ५०० मीटर अंतरावर पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.