मंगळवार, २२ मे, २०१८

भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश - २२ मे २०१८

भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश - २२ मे २०१८

* एएएफआर आशिया बँक ग्लोबल वेल्थच्या अहवालानुसार भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश ठरला आहे. 

* यासाठी प्रत्येक देशातील खासगी मालमत्तांचा बिगर सरकारी विचार करण्यात आला आहे. यात सरकारी महसुलाचा विचार करण्यात आलेला नाही.

* या खासगी मालमत्तेचे स्थावरजंगम मालमत्ता, रोकड, शेअर्स व्यावसायिक उत्पन्न आदीचा समावेश होतो. या सूचित अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील खासगी मालमत्ता ही ६२ हजार ५४८ अब्ज अमेरिकी डॉलर आहे.

* तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जपानमध्ये १९ हजार ५२२ अब्ज अमेरिकी डॉलर खासगी मालमत्तेच्या स्वरूपात आहे.

* यानंतर ब्रिटन ९ हजार ९१९ अब्ज अमेरिकी डॉलरची संपदा खासगी मालमत्तेच्या स्वरूपात आहे. यानंतर ब्रिटन व जर्मनी यांचा क्रमांक असून त्यांच्या पाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो.

* भारताने या सूचित ऑस्ट्रेलियात, कॅनडा, फ्रांस व इटलीवर आघाडी घेतली आहे. भारतामध्ये ८ हजार २३० अब्ज अमेरिकी डॉलर संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

* मोठ्या प्रमाणावरील उद्योगधंदे, उत्तम शिक्षण व्यवस्था, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी, आरोग्य सुविधा, स्थावर मालमत्ता आदींमुळे भारताने हे स्थान पटकावले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.