बुधवार, २३ मे, २०१८

कानपुर देशातील सर्वात अस्वच्छ रेल्वे स्टेशन - २३ मे २०१८

कानपुर देशातील सर्वात अस्वच्छ रेल्वे स्टेशन - २३ मे २०१८

* देशातील सर्वाधिक अस्वच्छ १० रेल्वे स्थानकांच्या यादीत मुंबईतील तीन स्थानकांचा समावेश आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे ही भारतातील टॉप टेन अस्वच्छ रेल्वे स्टेशनपैकी एक आहेत.

* भारतीय रेल्वेकडून ११ ते १७ या कालवधीत रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेबाबत सर्वे करण्यात आला होता. अस्वच्छ स्थानकामध्ये उत्तर प्रदेशातील कानपुर रेल्वे स्थानकाचा पहिला क्रमांक लागतो.

* कल्याण तिसऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस पाचव्या, तर ठाणे आठव्या स्थानावर आहे. मुंबईतील कल्याण, एलटीटी आणि ठाणे या मध्य रेल्वेवरील तिन्ही स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

* कल्याण स्थानकावरून दररोज २ लाख १५ हजार प्रवाशी प्रवास करतात. ९० लांब पल्ल्याच्या आणि ५७२ लोकल गाड्या दररोज या स्थानकावर थांबतात.

* जवळपास ५९ टक्के प्रवाशांनी कल्याण स्थानकांच्या अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एलटीटी आणि ठाणे स्थानकांच्या बाबतीत हे प्रमाण जवळपास ५६% एवढं आहे. एलटीटी स्थानकावर दररोज ५० हजार प्रवाशांची येजा होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.