मंगळवार, २२ मे, २०१८

राज्यात देहविक्री करणाऱ्या मुलींसाठी उज्वला केंद्रे - २१ मे २०१८

राज्यात देहविक्री करणाऱ्या मुलींसाठी उज्वला केंद्रे - २१ मे २०१८

* देहविक्रीसाठी फसवून आणलेल्या महिला व मुलींना आधार देण्यासाठी सरकारकडून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आणखी उज्वला केंद्रे सुरु केली जाणार आहेत. यात अशा पीडित महिलांचे  व्यवसायिक प्रशिक्षण देऊन पुनर्वसन केले जाणार आहे.

* अनैतिक व्यापारातून देहविक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला व मुलींची तस्करी होत आहे. त्यात परराज्यातील पीडितांची संख्या जास्त आहे.

* त्यात परराज्यातील पीडितांची संख्या जास्त असून, त्यातून सुटका झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने जिल्ह्यात अशी केंद्रे सुरु होती.

* या केंद्रातून वेश्या व्यवसायासाठी होणारी महिला व मुलींची तस्करी रोखणे, पीडितांची सुटका करणे याबरोबर पुनर्वसनासाठी त्यांना प्राथमिक सुविधा देणे, वैद्यकीय उपचार, समुपदेशन व कायदेशीर मदत यात केली जाणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.