बुधवार, ९ मे, २०१८

नरेंद्र मोदी जगातील पहिल्या १० सर्वात शक्तिशाली नेत्यांच्या यादीत - ९ मे २०१८

नरेंद्र मोदी जगातील पहिल्या १० सर्वात शक्तिशाली नेत्यांच्या यादीत - ९ मे २०१८

* फोर्ब्सने जारी केलेल्या नव्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील सर्वात पॉवरफुल नेत्यांच्या यादीत स्थान दिले आहे. फोर्ब्सने मोदींना पहिल्या दहा नेत्यांच्या क्रमवारीत नववे स्थान दिले आहे.

* या यादीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या या यादीत ७५ लोकांना क्रमवारीत स्थान दिले आहे.

* पृथ्वीवर ७.५ अब्ज लोक राहतात. पण यामध्ये ७५ पुरुष आणि महिलांनी जगाला बदलन्याचे काम केले आहे. याचा अर्थ असा की मोदींचाही अशा नेत्यांच्या यादीत समावेश आहे.

* ज्यांनी आपल्या हिमतीने जगाला बदलण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे मोदी हे फेसबुकचा मार्क झुकरबर्क १३ वा, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे १४ वा आणि ऍपलचे सीईओ टीम कुक २४ वा क्रमांक यांच्यापेक्षाही पुढे आहेत.

*फेसबुकवरही ४ कोटी लोक मोदींना फॉलो करतात. त्यामुळे जगातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तीपैकी ते एक आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हवामान बदलावर त्यांनी अत्यंत प्रभावी भाषण केले होते.

* त्याचबरोबर त्यांनी मागील चार वर्षातील आपल्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यामध्येही नोटबंदीच्या निर्णयाची फोर्ब्सने विशेष दखल घेतली.

* भ्रष्टाचार आणि मनी लॉन्डरिंग प्रतिबंध आणण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये अचानक ५०० व १ हजार रुपयांची नोट रद्द झाल्याचे जाहीर केले. फोर्ब्सने मुख्य संपादक स्टीव्ह फोर्ब्स यांनी  यापूर्वी मोदींच्या या निर्णयावर टीका केली होती.

* १६ महिन्यानंतर त्यांनी उपरती आली असून मोदींच्या या निर्णयाचे त्यांनी चांगलेच कौतुक केले आहे. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने लोकांच्या वैयक्तिक पैशाना हात लावला होता.

* हा अत्यंत धक्कादायक निर्णय असल्याचे फोर्ब्सने २४ जानेवारी २०१७ च्या अंकात म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.