मंगळवार, २२ मे, २०१८

केरळमध्ये निपाह विषाणूची लागण - २२ मे २०१८

केरळमध्ये निपाह विषाणूची लागण - २२ मे २०१८

* केरळमधील कोळीकोड व मल्लापुरम जिल्ह्यात भयानक विषाणूने थैमान घातले आहे. निपाह नावाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून, आणखी किमान २५ जणांच्या रक्त तपासणीत निपाह विषाणूने संक्रमण केले आहे.

* इंडियन मेडिकल असोसिएशन समिती या विषाणूचे मूळ शोधत असून, पुणे येथील व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट तपासणी रक्ताच्या तीन नमुन्यामध्ये निपाह विषाणू आढळून आले आहे.

* जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार निपाह विषाणू हा वटवाघूळ फळफळांच्या माध्यमातून मनुष्य व जनावरात पसरत आहे.

* मलेशियातील कापूंग सुंगई निपाह परिसरात १९९८ साली हा विषाणू आढळून आला होता. या विषाणूला निपाह नाव देण्यात आले.

* सर्वात आधी डुकरामध्ये याची लागण झाल्याचे दिसून आले होते. बांगलादेश येथे २००४ साली या विषाणूने थैमान घातले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.