सोमवार, १४ मे, २०१८

केंद्राच्या मंत्रिमंडळात महत्वाचे बदल - १४ मे २०१८

केंद्राच्या मंत्रिमंडळात महत्वाचे बदल - १४ मे २०१८

* लोकसभा निवडणुकीला अवघ वर्ष उरलेलं असताना पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात महत्वाचे बदल केले आहेत. स्मृती इराणी यांच्याकडून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे.

* या मंत्रालयाचा कारभार आता राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यापुढे राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यावर केंद्रीय क्रीडा मंत्रिपदासोबत केंद्रीय माहिती आणि  प्रसारण मंत्रिपदाचीही जबाबदारी आली आहे.

* इराणी यांच्याकडे असलेलं वस्त्रोद्योग मंत्रिपद कायम ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर किडनी संबंधित रोगाचे निदान चालू आहे.  अर्थमंत्रीपदाची अतिरिक्त धुरा रेल्वे मंत्रालयासोबत अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त भार असणार आहे.

* अरुण जेटली जोपर्यंत पूर्णपणे फिट होत नाही तोपर्यंत अर्थ मंत्रालयाचा कारभार पियुष गोयल यांच्याकडे असणार आहे.

* तर एस एस अहलुवालिया यांच्याकडील पेयजल आणि स्वछता मंत्रालयाचा कार्यभार काढून त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.