शुक्रवार, १८ मे, २०१८

राज्यात ३६ हजार पदे भरण्यात येतील - १७ मे २०१८

राज्यात ३६ हजार पदे भरण्यात येतील - १७ मे २०१८       

* राज्यातील विविध बिभागातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पदे भरण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ३६ हजार रिक्तपदे भरण्यास मंजुरी दिली आहे.

* राज्यात विविध खात्यात ७२ हजार पदे रिक्त असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेला उत्तर देताना सांगितले होते.

* ही पदे दोन टप्प्यात भरणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. यंदा पहिल्या टप्प्यात ३६ हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी ३६ हजार रिक्त पदे भरण्यात येतील.

* या जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषतः कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागातील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येईल.

* तसेच ग्रामीण भागातील विविध पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत असल्याने कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या ३६ हजार पदांमध्ये ११ हजार ५ पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८ पदे, गृह विभागातील ७ हजार १११ पदे, कृषी विभागातील २ हजार ५७३, पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७ पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे, जलसंपदा विभाग ८२७ पदे, जलसंधारण विभागातील ४२३ पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील ९० या पदासह नगरविकास विभागातील १ हजार ६६४ पदांचा समावेश होतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.