गुरुवार, १७ मे, २०१८

देशात बृहन्मुंबई सर्वात स्वच्छ राजधानी - १७ मे २०१८

देशात बृहन्मुंबई सर्वात स्वच्छ राजधानी - १७ मे २०१८

* केंद्र सरकारतर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षण स्पर्धेत बृहन्मुंबई महापालिकेला देशातील सर्वात स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मिळाला आहे.

* नागपूर, परभणी व सासवडसह राज्यातील आठ शहरांनी विविध गटात पारितोषिके पटकाविली. राष्ट्रीय पातळीवर हागणदारीमुक्ती व कचरा व्यवस्थापनात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या राज्यात महाराष्ट्राने झारखंड पाठोपाठ व छत्तीसगडला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकाविला.

* राष्ट्रीय पातळीवरील अव्वल तीन स्वच्छ शहरात इंदूर व भोपाळ या मध्यप्रदेशातील दोन शहरांनी पहिले दोन क्रमांक पटकाविले. तर चंदिगड तिसऱ्या क्रमांकावर आले.

* गोव्याची राजधानी पणजीलाही स्वच्छ राजधानी गटात पारितोषिक मिळाले आहे. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या इंदूरने तर सलग दुसऱ्या वर्षी देशातील सर्वात स्वच्छ महानगराचा मान मिळविला आहे.

* एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरात पश्चिम विभागात अंकलेश्वर वगळता, चारपैकी पाचगणी, सासवड, व शेंदूरजनाघाट अमरावती ही राज्यातील तीन शहरे विजेती ठरली आहे.

* देशातील सर्वात स्वच्छ राजधानी - बृहन्मुंबई, १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या - नागपूर, ३ ते १० लाख लोकसंख्या - परभणी, १ ते ३ लाख लोकसंख्या भुसावळ, १ लाखापेक्षा कमी लोकसंख्या - पाचगणी, सासवड, शेंदूरजनाघाट. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.