शुक्रवार, ४ मे, २०१८

डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचण्याचे उद्दिष्ट - ४ मे २०१८

डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचण्याचे उद्दिष्ट - ४ मे २०१८

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व गावांना वीज देण्याचे उद्दिष्ट केले. त्यानंतर आता डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक घराला वीज असे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. 

* गावांना वीज देण्याच्या व सर्व गावामध्ये वीज पोहोचली असल्याच्या त्यांच्या घोषणेनंतर त्यांच्यावर टीकाही होत आहे. मात्र ही मुळात अगदी कठीण असणारी बाब होती. 

* सर्वात शेवटी अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, छत्तीसगढ, येथील दुर्गम भागामध्ये विजेचे खांब नेणेही महाकर्मकठीण काम होते. १०२ गावामध्ये तर विजेच्या पुरवठ्यासाठी सामान नेणेही आव्हान होते व १ ते १० दिवस पायी चालून कर्मचाऱ्यांनी ते काम केले. 

* गावांचे विद्युतीकरण करण्याच्या घोषणेमध्ये विद्युतीकरण गाव या परिभाषेमध्ये १० टक्के घरात वीज असणे आवश्यक असते. राज्याकडून मिळालेल्या अहवालानुसार ग्रामीण भागामध्ये घरासाठी वीज देण्याची टक्केवारी ८२ टक्क्यापेक्षा अधिक आहे ही ४७ टक्के ते १०० टक्के या स्तरात आहे. 

* स्वातंत्र्याच्या वेळी देशात १५०० गावांमध्ये १९९१ पर्यंत ही संख्या वाढून ४,८१,१२४ इतकी झाली. व २००२ ते २००७ या दरम्यान १० व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ६३,९५५ गावामध्ये प्रथमच दिवे लागले.

* त्यानंतर ५ वर्षांमध्ये ४५,९५५ गावामध्ये वीज पोहोचली. २०१५ पर्यंत देशाच्या ९७% गावामध्ये वीज पोहोचली होती. यानंतरचे काम १००० दिवसामध्ये केले गेले. सप्टेंबर २०१७ मध्ये घोषित केलेल्या योजनेवर १६,३२० कोटी रुपये खर्च होणार असून त्या अंतर्गत गरीब कुटुंबाना मोफत वीज दिली जाणार आहे.

* सौभाग्य योजनेनुसार सरकारने डिसेंबर २०१८ पर्यंत घरामध्ये वीज पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ते काम गतीने चालू असून त्या योजनेमुळे आतापर्यंत ५० लाखापेक्षा अधिक कुटुंबाना विजेची जोडणी दिली गिली आहे.

* सरकारी आकडेवारीनुसार ८२ टक्के घरापर्यंत ही वीज पोहोचली आहे.  सरकारच्या माहितीनुसार आता गुजरात, गोवा, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुडुचेरी, येथील सर्व घरामध्ये वीज पोहोचली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.